काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular gazal by Ibn-e-Insha. Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
कोजागिरीची रात्र होती चर्चेत मात्र होतीस तू
कुणी म्हणाले चंद्र आला कुणी म्हणाले होतीस तू
जात होतो तिथून आम्ही विचारले गेले आम्हाला
हसून शांत ओलीस आम्ही पडदा नशीन होतीस तू
रिकामे समारंभ सारे भेटू कुणाला शहरात या
तुझे नाव तोंडी प्रत्येक होते अनामिका जरी होतीस तू
संन्यासीच होणार होतो आम्ही, वगळून असणे तुझे
थेंब घनाचा, अनिल वनाचा, ठाव मनाचा झालीस तू
आमचे त्याग राजरोस उद्विग्न आमची अजीजी
करून उपकार चोरटे निष्काळजी होतीस तू
दोन थेम्ब अश्रुंचे आहेत पापणीवरी थांबले
एक होता तुझ्या साठी दुसऱ्यात खुद्द होतीस तू
संकोच नाही आवास नाही तक्रार तरी केली कुठे
पळून गेलीस ही "कल्पना" विलासात होतीस तू
कीव केलीस फक्त माझी घातलीस भीक नाही
धरला नाही पदर तुझा काय सोडवीत होतीस तू
आहेस तू खाण रूपाची पण अनाठायी गर्व त्याचा
रचल्या कविता किती कवींनी, प्रसिद्धी पावलीस तू
रचावी कृष्णकृत्ये चांगली गज़ल निर्दयी असावी
निंदून शायरीत जपलेले उन्मेषित मोरपीस तू
Background score by
Music by pianocafe_Kumi from Pixabay
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Shagird (1967)". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
ती: जरासा तो नाराज आहे, नयनांत पण लाज आहे
तो: अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
ती:
अवसेची चांदणी धाडे तू रुसल्याचा सांगावा
आवरे ना मुळीच रडू, जीव माझा टांगावा
तो:
सारे मनीचे खेळ तुझ्या, ऐकू नकोस हा कांगावा
जवळी तू येऊनी माझ्या आपला शृंगार रंगावा
तीच अगोचर चांदणी आता तुझा साज पाहे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
तो:
सुमसौरभ दरवळे घेऊन तुझ्या बटांचा ठाव
निशेने क्षीरकेशर पिऊन मांडला रंगीत डाव
ती:
केशर आकाशात नाही तोवर आहे वाव
छाती छप्पर हात भिंती तूच माझा गाव
तो:
धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदणारी गाज वाहे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
ती:
भाकते करुणा तुझी चुकवू नकोस माझा ठोका
लाल माना गाल रक्तिमा कसे काय सांगू लोका
तो:
अजून रात्र गुलाबीच, खांद्यावर माझ्या घे झोका
झोप आगंतुक आली, त्याचा फक्त आहे धोका
तुझ्या ओष्ठ कमलांचे अमृत मला पाज ना हे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
ती:
आता नयनांत लाज नाही, पण गोडसर माज आहे
अबोलून सांगण्याचे सगळे निमित्त आज आहे
Background score by
Muhammad Usama from Pixabay
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Kabhi Kabhie". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
पाहिले टक लावुनी तरी लवत नाही पापणी
पाहिले रम्य देखावे , झोपेत की जागेपणी
भेटी झाल्या हुरहुर तरीही शहारे उरलेच आणि
पाहिले रम्य देखावे , झोपेत की जागेपणी
वितळले अंग माझे नजर तुझी धगीची
बर्फात उमले बहावा ऋतूचक्रे सुगीची
लपेटून आग घेई काया ही आरस्पानी
पाहिले रम्य देखावे झोपेत की जागेपणी
रंग सगळे सुगंध सगळे रचू लागले डाव
चंद्रधनू अन् सूर्य चांदणे, स्वप्नपाखरा धाव
वाटते जग संपावे सोनकेशरी या क्षणी
पाहिले रम्य देखावे झोपेत की जागेपणी
पापणीवरी पडली पापणीची तुझ्या सावली
चेहऱ्याची लाली तुझी गाली माझ्या विसावली
अवीट उन्मादक या अदा आहेस तू यक्षिणी
पाहिले रम्य देखावे झोपेत की जागेपणी
Background score by
Music by Kalpesh Ajugia from Pixabay
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Madhumati". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
भूल पडे जगाची असली भीती वाटे मजला
रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला
परागमिषे जाती फुलांचे निरोप
उन्मेषित डोले दंग मनी रोप
रुणझुणता पाऊसही आषाढाचा रुजला
रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला
घेई वळणे कमनीय सरिता
साजरा झरा तिच्याकरिता रिता
रानवारा बरा वाहे "बनी" दुरिता
यमुनातीरी जणू कृष्णपावा वाजला
रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला
गगन भिडे या जादुई जागी धरा
मीलन असले देवाजीच्या घरा
कल्पनाविलासी माझा मन-मानस लाजला
रमणीय सहल मोसमी जणू स्वर्गाचा मजला
Background music by
https://www.youtube.com/watch?v=V8UaPtzk6t8
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Bobby". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
शकले हृदयाची घेऊन छातीचा पिंजरा
कैद भावना मरणप्राय त्या सांगू पाहतो जरा
एक डोळा खरा सोबती दुसरा निलाजरा
एकमेकां साथ करती विरहोत्सव साजरा
एक नाही या दुःख जगी, पण
दुष्कर प्रेमवियोगाचे दडपण
खऱ्या प्रेमात विरते दोघांचे मीपण
आणि होतात पाणीदार नजरा
एकमेकां साथ करती विरहोत्सव साजरा
नावालाच फक्त आहे आनंद आता जगी या
उपयोग नाही त्याचा, तुझ्या शिवाय मी जोगीया
उदासीतही या मी आता सुखे विरह भोगिया
जपला आहे चिरगंध तुझ्या वेणीतला गजरा
एकमेकां साथ करू विरहोत्सव साजरा
Background score by
https://www.youtube.com/watch?v=FRVnUiZlctk
Recording by
Onkar Tarkase
https://open.spotify.com/artist/0xduvOCrxqfpnTU46KuyHC?si=i6t0iPbWRIig_tZThbwEvQ
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Zehreela Insaan". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
परी माझी स्वप्नपरी तू, कशी संचारी आकाशी
अभिलाषा घेऊन माझ्या पसरले पंख सावकाशी
श्वासांत माझ्या जाणवे तुझा गजरा अबोली
निशा माझ्या बहरती कल्पून तुझी देहबोली
येशील तू कधी जीवनी अशी मला हवी तशी
परी माझी स्वप्न परी तू कशी संचारी आकाशी
रमणी तू हंसा नराची, जो सरोवराज असतो परंतु
वेचत असतो तुझ्याचसाठी मनोभावे कमलतंतू
सेवन तू तयाचे करता पक्षिराज तो राहतो उपाशी
परी माझी स्वप्न परी तू कशी संचारी आकाशी
Background by
https://www.youtube.com/watch?v=rV8hOBJmdhE
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Barsaat ki raat". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
विसरणार नाही चुकूनही पावसाची रात्र ती
एक रसिका अनामिका गवसलेली मला ती
रेशमाच्या केशांतुनी ओथंबले तुझ्या पाणी
गालमैदानात सोडी थेंब ओली निशाणी
काबीज ते मैदान करण्या ओठांना येते गती
एक रसिका अनामिका गवसलेली मला ती
वीज मग धावून येते बिलगते ती मला पुरती
आलिंगनास त्या आता युगे आम्हा न पुरती
जादुई रजनी अशी न भूतो न भविष्यति
एक रसिका अनामिका गवसलेली मला ती
पदर ओला गच्च तिने असा टाकला पिळून
नजरबाणाने भेदक तिच्या गेलो मी खिळून
उष्ण झाले श्वास आणि गुंग झाली मती
एक रसिका अनामिका गवसलेली मला ती
यमक आणि प्रास माझ्या कवितेची होती
तारुण्यसहज भावनांचा परिपाक ती होती
स्वर्गातील ती रती अमर केली एक राती
एक रसिका अनामिका गवसलेली मला ती
Background score by
https://www.youtube.com/watch?v=HHF_o3RAxS4
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Chhaya". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
घनसावळा जरी मी प्रेम का तू माझ्यावर करी
बेघर दिशाहीन मी कोण येई माझ्या आसरी
घनसावळा बेघर तू आवडे हीच गोष्ट खरी
जन्मोजन्मीची साथ आपुली मी तुझ्यातल्या सरी
थांबला तो संपला हे ब्रीदवाक्य माझ्या चवरी
फरफट माझ्यासोबत अशी येशील कुठवरी
घनसावळा जरी मी प्रेम का तू माझ्यावर करी
बेघर दिशाहीन मी कोण येई माझ्या आसरी
रे गगनाच्या सदनिकेतला अनिकेत असलास तरी
स्वार होईन धुक्याच्या रथात होऊन मी अपंख परी
घनसावळा बेघर तू आवडे हीच गोष्ट खरी
जन्मोजन्मीची साथ आपुली मी तुझ्यातल्या सरी
का प्रेमात सारे विसरुनी होतेस वेड्या कुणाचीतरी
राधेसम हरले यमुनेच्या तीरी तूच माझा हरी
घनसावळा जरी मी प्रेम का तू माझ्यावर करी
बेघर दिशाहीन मी कोण येई माझ्या आसरी
Background score by
https://www.chosic.com/free-music/all/
Mozart Symphony No. 40 In G minor
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Mamta". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
होऊन फूल ठेवलेले जपून तू एका वहीत
होऊन झुळूक तू सोडवलेल्या बटांसहीत
होऊन दिल्या एकमेकां आणाभाका सराईत
सोडून जाईन मी पण, अंगणी दरवळेन जाईत
भरेन मी रंग मोहक ऋतू होतील वातावरणी
शिंपडेन मी गारवा केसांची करून अत्तरदाणी
वसंत वा शिशिर, फुलवेन मोहोर आमराईत
सोडून जाईन मी पण, अंगणी दरवळेन जाईत
गेला आठवणींचा आपला सारीपाट सरकताही
भेटी आणि विरह झाले केला त्यात फरक नाही
जिंकून घेतलीस मनभूमी सरसावून बाही
अलेख सारे "टाक" शब्द कारण विरले दाट शाईत
सोडून जाईन पण, अंगणी दरवळेन मी जाईत
थांबशील तू माझ्या राख झालेल्या चितेपाशी
टळून गेली रात्र जरी जमवशील सूत प्रहराशी
राहशील आपल्या प्रेमा आहे खात्री ऋणाईत
सोडून जाईन मी पण, अंगणी दरवळेन जाईत
Background score by
https://www.youtube.com/watch?v=5rfYYF9UWSg
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Ghar". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem:
पावलांस माझ्या आताशा पुरेना ही अंगणे
पाहिले तुला की होते अस्मान मला ठेंगणे
धरला तुझा हात जेधवां दिसली भाग्यरेषा
हरपून बसले मी त्या शकुनांच्या लवलेशा
दैवनाळ ही जोडलेली आता नाही भंगणे
पावलांस माझ्या आताशा पुरेना ही अंगणे
झोप जरा रागावते, तव जागवते मोहिनी
विसावतो लोभस तुझा चेहरा मज लोचनी
पापण्यांचे पंख करुनी डोळ्यांचे तरंगणे
पावलांस माझ्या आताशा पुरेना ही अंगणे
इतक्याश्या गोष्टीत आता लीलया ते दंगणे
रात्र होतीच स्वप्नील, दिवा-स्वप्नातही रंगणे
बेभान मी, सावरून घे इतुकेच आहे सांगणे
पावलांस माझ्या आताशा पुरेना ही अंगणे
खुशाल कसे जमते तुला जीव माझा टांगणे
पाहिले तुला की होते अस्मान मला ठेंगणे
पावलांस माझ्या आताशा पुरेना ही अंगणे
Background score by
https://www.youtube.com/watch?v=ZlFRd17_z8Q
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Madhumati". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem :
नकोत परदेशातून आलेले निरोप तुझे भोळे
साक्षातील तुझ्या रुपावर मन माझे भाळे
अथक तुझी वाट पाहून दमले माझे डोळे
चंदनाच्या सावलीतही शरीर माझे पोळे
मी पणतीची अशी आग्रही वात आहे जी
फुले ना पण ती विझायलाही नाही राजी
पतंग यावा म्हणून करते तिची ज्योत अजिजी
घेई तो पतंगही थोडे पेट घेण्याआधी हिंदोळे
चंदनाच्या सावलीतही शरीर माझे पोळे
तुझ्याशी आहे जडले नाते जन्म जन्मांतरीचे
विसरलास का आपले ते खास बेत खात्रीचे
व्यर्थ माझे असणे आहे तुझ्याविना रात्रीचे
आणि दिवसही होतात दुर्लक्षिलेले पाचोळे
चंदनाच्या सावलीतही शरीर माझे पोळे
नदी मी प्राचीन तरीही तहान माझी कशी न भागे
अमर्याद डोह माझे गणितातला जसा शून्य भागे
तुझ्याविना घेतलेला श्वास भरतो मला रागे
निरभ्र आकाशही काळ्या मेघांनी झाकोळे
चंदनाच्या सावलीतही शरीर माझे पोळे
Background score by
https://www.youtube.com/watch?v=nwjQQy-rPl0
Concept and Execution by
Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Safar". Listen to the podcast to know which one it is!
Marathi Poem
सजीवन तुझे नयन
आजीवन हे उन्नयन
सुरुपाची तुझी खाण
जपून ठेवी सागर वाण
चितारती तुझे चित्र कोणी
रचे तुजवर काव्यकहाणी
छंद ताल अन रंग पाणी
अपुरे, सौंदर्य तुझे आरस्पानी
हृदयाचे जणू तू स्पंदन
अन जीवनाचे अयन
सजीवन तुझे नयन
आजीवन हे उन्नयन
मधुकेशरी श्वास परिमळ
कोमल कर जणू कमळ
नतवदन किरणे निर्मळ
नेत्रपल्लवी हरणे चपळ
पदराचा मागोवा घेऊन
न्यावेस तू मला शयन
सजीवन तुझे नयन
आजीवन माझे उन्नयन
Background score by
https://www.youtube.com/watch?v=DlsTIrBUDio
Concept and Execution by Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Rajnigandha". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem
कधी कधी मन चाकोरीच्या पलीकडे धावते
आपापल्या आखलेल्या रेषा आधी लांघते
कुण्या काळच्या अतृप्त कामनेस तहानते
पाहुनी सर्व घाबरते, चित्त चंचल लहान ते
जीवन म्हणजे बाग एक इथे फुलांचे ताटवे
मनात माझ्या घर केलेले फूल मला आठवे
खुडावे की तोडावे त्या डहाळी ला विचारते
कधीकधी मन चाकोरीच्या पलीकडे धावते
कळेना ओढाळ मनाची सोडवू मी कशी कोडी
विसरून सर्व गेले तरी येतेच आठवण थोडी
कोण होईल प्रिय आणि कोण मला भुलवते
कधीकधी मन चाकोरीच्या पलीकडे धावते
Background score by
https://www.youtube.com/watch\?v\=iviwo1a1Ovo
Concept and Execution by Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Masoom". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem
आयुष्या, मी नाराज नाही पण थोडासा थक्क आहे
कोडी तुझी निष्पाप काही ती सोडवल्याचे दुःख आहे
केला मी जगण्यासाठी वेदनांचा सांभाळ आहे
कर्जात मी हास्याच्या झालो अश्रूबंबाळ आहे
स्मितहास्यही ठरले चेहऱ्यासाठी कलंक आहे
आयुष्या, मी नाराज नाही ,पण थोडासा थक्क आहे
डोळे भरले, इतुके बरसले, की मेघ वरमला आहे
झरे आटले भावनांचे आता जीवही दमला आहे
कारण माझ्या अश्रूंवरही फक्त लोकांचा हक्क आहे
आयुष्या, मी नाराज नाही, पण थोडासा थक्क आहे
आयुष्या, तू समजावलीस दुःखातही नवी नाती
मनुष्या, तुझा जन्म शिकवतो वेदना संवेदना ती
सहज मरणही येत नाही इतकाच करतो शोक आहे
आयुष्या, मी नाराज नाही, पण थोडासा थक्क आहे
background score by
https://www.youtube.com/watch?v=nrFaQ9REXRM
Concept and Execution by Unmesh Joshi
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Chaudhvin Ka Chand". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem
शीतल शशि भासतेस असुनी तू सविता
शपथ घेतो त्याची जो आहे तुझा करविता
मानेवरती रुणझुणत्या घनदाट तुझ्या बटा
नयन-गडू दाखविती मयसभेच्या कैक छटा
मानवरूपी देहातील मदिरा तुझी पिता
शीतल शशि भासतेस असुनी तू सविता
सरोज-वदन उमले सारे सरोवर भारती
त्या कमलमुखा वरी सारे भ्रमर गुंजारवती
तुला पाहुनी स्फुरते निरक्षरासही कविता
शीतल शशि भासतेस असुनी तू सविता
लखलखते वीज तुझ्या ओठी हसू ओविता
नमते चराचर सारी सृष्टी तुला आठविता
प्रीत या जगी जन्मते तारुण्य तुझे प्रसविता
शीतल शशि भासतेस असुनी तू सविता
देखणे लावण्य तुझे शोभतेस रुपगर्विता
शीतल शशि भासतेस असुनी तू सविता
शपथ घेतो त्याची जो आहे तुझा करविता
Background score by
https://www.youtube.com/watch?v=sruxu3dkLlA
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Naya Daur". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem
साथ मागुनी मी तुझी केली अनोखी मागणी
आयुष्य हे बहरले तू राग मी तुझी रागिणी
मनाला मनकवडा जणू त्याचा मिळाला
मला मदन माझा जन्मांतरीचा मिळाला
अभिलाषांचा माझा कल्पवृक्ष मिळाला
इच्छा होता सादर वस्तू लवता माझी पापणी
साथ मागुनी मी तुझी केली अनोखी मागणी
अल्लड मनास आता होते जाऊ असेच कुठेतरी
नेशील तू माझा मनोहर विश्वास आहे अंतरी
प्राण तू अन हृदय तू झालास माझे निरंतरी
गाथा लिहे आपली अशी बनली नाही लेखणी
साथ मागुनी मी तुझी केली अनोखी मागणी
Background score by
https://www.youtube.com/watch?v=qwveFY4182s
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a not-so-popular song from the film "Madhumati". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem :
प्रियकर माझा प्रेमळ जुलमी
लोचन त्याचे अंमळ मलमी
वसनांत त्याच्या कोमल तलमी
त्याच्या "पाशी" सुकर गुलामी
मधाळ कस्तुरीसम गूज
हलकेच वाजवी अलगूज
यक्ष-किन्नर करती कुजबूज
त्याच्यापाशी नेतो तुला मी
त्याच्या "पाशी" सुकर गुलामी
शब्दा शब्दातून भिनतो
अब्दा अब्दातून बरसतो
दिसतो चंद्रातही फक्त तो
जाते विसरून मला मी
त्याच्या "पाशी" सुकर गुलामी
Tags: Marathi, Marathi poems, Indian poems, Marathi songs, Indian songs, Indian Marathi poems
Background score by
https://www.youtube.com/watch?v=grDrtbZis_M
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "Jeeva". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem :
नित्य भाळी दंग डोळी "श्याम"सुंदर काजळी
सत्य श्यामल स्वप्न श्यामल श्याम भासे मृगजळी
केशव केशव केशरनाव मुखात घोळवते मी
एकांताचे घाव बसती गोड माझ्या वर्मी
आणि आता खेदमधू हर्षवतो गोपाळी
नित्य भाळी दंग डोळी "श्याम"सुंदर काजळी
एक थोडे कूट कोडे सोडवशील का ते तू
मारुनी मन जगतो आहे, ग्रासले राहू केतू
आहेत ग्रह सारे तुझ्या वदनात की नभोमंडळी
नित्य भाळी दंग डोळी "श्याम"सुंदर काजळी
दडविती गूढ नयनांचे कुरळी तुझी झुलपे
अडविती झोप स्वप्नांची खळी गालांवरी लपे
गोजिरे रूप साजिरे तुझे घाले मनास भुरळी
नित्य भाळी दंग डोळी "श्याम"सुंदर काजळी
श्याम जळी श्याम स्थळी श्याम आहे मनगोकुळी
Tags: Marathi, Marathi poems, Indian poems, Marathi songs, Indian songs, Indian Marathi poems
Background score by
https://www.youtube.com/watch?v=hAmRYFFfDjU
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a pleasant song from the film "Ek Musafir Ek Hasina". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem :
आभार कसे मानू तुझे, उपकार झाले किती
तुझे आगमन जीवनात झाले मंगल तिथी
पावलांस तुझ्या जाया कोणती नाही मिती
नेत्रसागरात तुझ्या विलीन होईन अशी भीती
नजराणा विशुद्ध प्रेमाचा तबकात मनाची माती
एकेका वाक्याची कादंबरी अन कटाक्षाच्या फिती
देव करो, असले सोनेरी क्षण लागो माझ्या हाती
आभार कसे मानू तुझे, उपकार झाले किती
आनंद विपुल आहे पण खेदालाही नाही क्षती
कारण अपुली साथ धरेची परिवलने संपविती
पुन्हा आपली भेट व्हावी झुगारून सगळ्या रीती
असे त्या विश्वेश्वरा माझ्या नसानसा विनविती
आभार कसे मानू तुझे, उपकार झाले किती
रुपगर्विता होऊ नये मी भयाकुल लंकेची पार्वती
नाटिकेत जीवनाच्या उत्कट प्रवेश झाले अती
कौतुकांचे कर्ज झाले जपली नाही पावती
जळला दुरभिमान माझा, चित्तही गेले सती
आभार कसे मानू तुझे, उपकार झाले किती
तू आलीस अन जीवनाची कर्त्यव्यता इति
Background score by:
https://www.youtube.com/watch?v=rjVErII5xF4
काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a timeless song from the 1957 film "Pyaasa". Listen to the podcast to know which one it is!
Marathi poem :
बदल्यात प्रीतीच्या कशी सर्वांना प्रीत मिळे
प्रेमाचे आभाळ आमुच्या कोरडे अवर्ष निळे
आनंदाचे डोही आपुलकीच्या मोही
धीर उसासे दोही मिसळून खेद पोही
सहनीय नाही मनाचा दिवा वातीविना जळे
प्रेमाचे आभाळ आमुच्या कोरडे अवर्ष निळे
बदल्यात प्रीतीच्या कशी सर्वांना प्रीत मिळे
दूर गेले सखेसोबती देऊन आणा भाका
वेळ येते खराब ती प्रसंग येतो बाका
प्रतिबिंब सुद्धा माझे होऊ पहाते वेगळे
प्रेमाचे आभाळ आमुच्या कोरडे अवर्ष निळे
बदल्यात प्रीतीच्या कशी सर्वांना प्रीत मिळे
जीवन ऐसे जर नाव याला तर जगू आम्ही बापडे
गिळू आवंढा पिऊ अश्रू, त्यागू जाणिवेचे कातडे
दुःखाची अन भीती कशाला लागले त्याचेच लळे
बदल्यात प्रीतीच्या कशी सर्वांना प्रीत मिळे
प्रेमाचे आभाळ आमुच्या कोरडे अवर्ष निळे
Background score by
https://www.youtube.com/watch?v=WyUcnMMLFHY