Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Business
Society & Culture
Health & Fitness
Sports
Technology
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Podjoint Logo
US
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts211/v4/b2/0f/b6/b20fb687-8c2f-8cfd-7318-9e482d8c139d/mza_14860217722091511451.jpg/600x600bb.jpg
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhans Prakashan
91 episodes
5 days ago
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Show more...
Books
Arts
RSS
All content for राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor is the property of Rajhans Prakashan and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Show more...
Books
Arts
Episodes (20/91)
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
एका स्थापत्य अभियंत्याची कर्तृत्वगाथा | पाषाणाचे पाझर | Rajhans Prakashan
सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांच्या काळाचे कोलाज आहे! संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य तर सिव्हिल इंजीनिअर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुशाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिहिल्यासारखी तारखांची आणि प्रमुख घटनांची नोंद नाही. तर त्यात नाट्य आहे. कुमारवयातलं प्रेम, घरच्यांचा विरोध ते स्वतःला सिद्ध करत घरच्यांच्या संमतीनं झालेला आंतरजातीय प्रेमविवाह आहे. तमिळनाडू-पश्चिम बंगालपासून ते अबूधाबी-इराक आणि नेपाळमध्ये साकारलेल्या महाकाय प्रकल्प उभारणीतलं योगदान आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, जगण्या-मरण्याचे प्रसंग आहेत, मुंबईतल्या लँडमाफियांपासून भ्रष्ट प्रशासनापर्यंत अनेक पातळ्यांवर केलेला संघर्ष आहे. पाषाणाचे पाझरमधून एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सिरीजला शोभेल अशी दीर्घ कथाच विवेक गाडगीळ स्वतःच्या जगण्यातून उलगडतात. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमधून. Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/pashanache-pazar-book Book: Pashanache Pazar Author: Vivek Gadgil Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #vivekgadgil #pashanachepazar #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
5 days ago
38 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
अलौकिक अंटार्क्टिका | Antarctica Travel Story | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/antarctia-atarakataka निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते. त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
2 weeks ago
13 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
एक होता कार्व्हर | Veena Gavankar | Rajhans Prakashan
Ek Hota Carver Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/ek-hota-carver-eka-hata-karavahara-dalkasa-aavatata जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे. वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्या एक होता कार्व्हर या चरित्रानं मराठी साहित्यात इतिहास रचला. वीणाताईंचं कार्व्हर वाचलं नाही असा रसिक वाचक मिळणं अवघड. १९८१ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीपासून प्रत्येक पिढीवर कार्व्हरचं गारूड कायम आहे. ज्यांनी कार्व्हर पूर्वीच वाचलंय त्यांच्यासाठी आणि कार्व्हर लवकरच हाती घेणार आहेत अशा नवीन पिढीसाठीही एक होता कार्व्हरमधला निवडक भाग आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात. Book: Ek Hota Carver Author: Veena Gavankar Book Narration: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #ekhotacarver #marathibookreview #veenagavankar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
3 weeks ago
8 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
अफाट विश्वाचा सुबोध परिचय | Dr Girish Pimple | Rajhans Prakashan
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार्‍या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार्‍या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे - ओळख आपल्या विश्वाची हे पुस्तक. Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/olakh-aplya-vishvachiee-olikha-aapalya-vashavaca Book: Olakh Aplya Vishwachi Author: Dr Girish Pimple Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
1 month ago
37 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
घुमक्कडी: कविता महाजन यांचे अखेरचे पुस्तक | Rajhans Prakashan | Marathi Book Narration
Ghumakkadi Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/ghumakkadi कविता महाजन यांचे 'घुमक्कडी' हे अनोखे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनाने वाचकांच्या भेटीस आणले आहे. 'ब्र', भिन्न, 'मृगजळीचा मासा' , 'ग्राफिटी वॉल', 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' , 'समुद्रच आहे एक विशाल जाळं' या सारखी गाजलेली पुस्तके कविता यांनी राजहंससाठी लिहिली. 'घुमक्कडी' या पुस्तकात भटकंती आणि त्या-त्या परिसरातील उत्पत्तीकथा-लोककथा यांचा समावेश आहे. अचंबित करणाऱ्या माहितीने भरलेले लेख आहेत. कविता महाजन यांचे हे शेवटचे पुस्तक. यातला पाऊस आणि अश्रू हा लेख आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात.. Book: Ghumakkadi Author: Kavita Mahajan Narration: Aparna Joag Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #mialladiyakhan #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
1 month ago
7 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
विश्वास पाटील यांची वास्तवदर्शी महागाथा | Lust for Lalbaug | Vishwas Patil
विश्वास पाटील यांच्या राजहंसी पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/vishwas-patil-vashavasa-patal आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग या दीर्घ कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन सादर करताहेत अभिनेते नचिकेत देवस्थळी. तर लालबाग, परळ, गिरणगावात घडणाऱ्या या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेतील काही आठवणी सांगताहेत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉ. सदानंद बोरसे. राजहंस प्रकाशनाच्या इंद्रधनुषी साहित्य योजनेअंतर्गत विश्वास पाटील यांच्या सर्व राजहंसी कलाकृती २५ टक्के सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. Book: Lust for Lalbaug Author: Vishwas Patil Narration: Nachiket Devasthali Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #vishwaspatil #marathipodcast #rajhansimohor Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
1 month ago
15 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
..आणि वयाच्या ८९ व्या वर्षी अल्लादियाखां यांनी गाजवली संगीत मैफल
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषद ही भव्य सांगितीक मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्या अध्यक्षस्थानी होते न्यायमूर्ती जयकर. तर या मैफलीची सांगता झालेली उस्ताद अल्लादियाखां यांच्या गायनानं. वास्तविक तेव्हा अल्लादियाखां हे ८९ वर्षांचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी नम्रपणे नकार दिला होता. पण स्वतः बॅरिस्टर जयकर यांनी आग्रह केल्यानं त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं होतं. या संपूर्ण प्रसंगाचं चित्रण मी अश्विनी भिडे देशपांडे लिखित मी अल्लादियाखां या चरित्राच्या पहिल्या प्रकरणात आहे. याचं अभिवाचन केलंय अभिनेता नचिकेत देवस्थळी यांनी. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
1 month ago
17 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
एक अनघड प्रवास उलगडणारं फकिरी | Fakiri | Datta Bargaje | Rajhans Prakashan
खरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण, मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा. ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही, स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास. Book: Fakiri Author: Datta Bargaje Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #fakiri #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
2 months ago
27 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले 'माझे शाळेतले प्रयोग' | Smita Gaud | Rajhans Prakashan
गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील ‘विद्या मंदिर’ ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य. वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास. विद्यार्थी, पालक, सहयोगी शिक्षक आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या अनेक व्यक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साकारलेले - प्राथमिक शाळेतील शिक्षिका ते शिक्षणप्रशासनात सहभागी झालेल्या शिक्षणाधिकारी अशा विविध भूमिकांमधून भरीव योगदान देणा-या हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले - माझे शाळेतले प्रयोग. Book: Maze Shaletle Prayog Author: Smita Gaud Podcast Host: Dr Priya Nigojkar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #mialladiyakhan #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
2 months ago
41 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
मी...अल्लादियाखां | Mi Alladiyakhan | Ashwini Bhide Deshpande | Marathi Book Podcast
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब...जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते. जणू ‘गायनाचे गौरीशंकर'! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी. मी अल्लादियाखां या पुस्तकाच्या लेखिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याशी संवाद साधताहेत ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम Book: Mi Alladiyakhan Author: Ashwini Bhide Deshpande Podcast Host: Mukund Sangoram Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #mialladiyakhan #marathibookreview #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
2 months ago
39 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
दौशाड: दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक | Daushad Book | Rajhans Prakashan
Doushad Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/doushad दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. ती सांगत असते, ‘कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही.’ तिचाच आदर्श आम्ही घेतला. Book: Doushad Author: Dr Nandkumar Raut Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #doushad Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
2 months ago
34 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
गोष्ट रिझर्व्ह बँकेची | Goshta Reserve Bankechi | Rajhans Prakashan
शेतकर्‍यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार्‍या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती? देशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन् सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून दीर्घकालीन परिणामांपर्यंत अनेक घटकांवर परिणाम करणार्‍या धोरणांची आखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक. भारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार्‍या रिझर्व्ह बँकेचा रोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर. Book: Goshta Reserve Bankechi Author: Vidyadhar Anaskar Podcast Host: Mukund Sangoram Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #vidyadharanaskar #reservebankofindia Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
3 months ago
38 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
मृत्यूचा शांत, संयत स्वीकार शक्य आहे? | Sobat Sanjvelchi | Rajhans Prakashan
आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते. Book: Sobat Sanjvelchi Author: Dr. Priyadarshini Kulkarni Translator: Padmaja Mehendale Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
3 months ago
26 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
शिवचित्रांचा व शिवस्मारकांचा वेधक आढावा | Suhas Bahulkar | Marathi Podcast
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले. त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत. कुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. Book: Katha Shivchitranchya Vyatha Shivsmarakanchya Author: Suhas Bahulkar Podcast Host: Sarang Darshane Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
3 months ago
26 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या | Suhas Bahulkar | Marathi Book
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले. त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत. कुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. Book: Katha Shivchitranchya Vyatha Shivsmarakanchya Author: Suhas Bahulkar Podcast Host: Sarang Darshane Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
3 months ago
23 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Inshaallah Novel Review | Abhiram Bhadkamkar | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/inshaallah-inashaallha 'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह' Book: Inshaallah Author: Abhiram Bhadkamkar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
4 months ago
28 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Manik Varma ani Parivar | Manik Moti | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/manik-moti-mani-varma-ani-parivar-manaeka-mata-manaeka-varama-aanae-paravara ‘माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्‍या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट म्हणजे 'माणिक मोती - माणिक वर्मा आणि परिवार' हे पुस्तक Book: Manik Moti: Manik Varma ani Parivar Author: Shobha Bondre Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
4 months ago
32 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
शोध बदलत्या पृथ्वीचा | Suneet Potnis | Rajhans Prakashan
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shordh-badaltya-pruthvicha-shathha-bthaltaya-pathavaca आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्‍या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट! कोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या प्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती जिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे - शोध बदलत्या पृथ्वीचा Book: Shodh Badaltya Pruthvicha Author: Suneet Potnis Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
4 months ago
19 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
राजीव तांबेंच्या भन्नाट मुलांच्या गोष्टी | Rajiv Tambe | Rajhans Prakashan
प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी खास मुलांसाठी त्यांच्या शैलीत सादर केलेल्या डुकरू, कावळू आणि पालू या गोष्टी तुमच्या घरातल्या बच्चे कंपनीला नक्की ऐकायला द्या! या गोष्टी ऐकून त्यांना उत्सुकता वाटली तर तांबे सरांची पुस्तकंही त्यांना आवर्जून घेऊन द्या. Author and Narrator: Rajiv Tambe Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
4 months ago
27 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
वॉकी टॉकीचा शोध | Rajhans Children Stories
मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित वॉकीटॉकीचा शोध ही गोष्ट निर्मोह मेढेकर आणि माहिरा रूद्राके यांनी वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: Samadhan Shiketod Narrator: Nirmoh Medhekar and Mahira Rudrake Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #childrenstories #marathipodcast #marathiliterature Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Show more...
4 months ago
9 minutes

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.