ऋषिकेश दाभोळकर हा आमचा मित्र ‘कुल्फी’ या मुलांसाठीच्या नियतकालिकाचा आणि ‘अटक मटक’ या वेबसाइटचा संपादक. अलीकडेच त्यानं ‘गोष्टदिंडी’ नावाचा अनोखा उपक्रम पार पाडला. पाठीवर पुस्तकं लादून तो चालत सुटला, वाटेत लागणार्या शाळांमधून मुलांना गोष्टी सांगितल्या आणि त्यांना पुस्तकं दाखवली, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या उपक्रमामधले त्याचे अनुभव अद्भुत आणि उद्बोधक दोन्ही होते. त्यांबद्दल त्याच्याशी गप्पा.
आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे, भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. खेरीज - त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, कागद - रंग - टंक - बांधणी - टिकाऊपणा… याबद्दल त्यांचा स्वतःचा पुष्कळ विचार आणि ठाम मतं आहेत. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी त्याबद्दल केलेल्या गप्पा.
सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट युट्युब ब्लॉग फेसबुक
भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांचं संपादन, प्रकाशन, वितरण आणि एकंदरच पुस्तक व्यवहार याबद्दल केलेल्या गप्पा.
सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट युट्युब ब्लॉग फेसबुक
पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध्यपूर्ण इतिहासाची ग्वाही देणारंही आहे. त्याचं भाषांतर मनोविकास प्रकाशानातर्फे प्रकाशित होतंय. त्याबद्दल भाषावैज्ञानिक चिन्मय धारूरकर यांच्याशी जितेंद्र वैद्य आणि मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय धारूरकर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
आपल्यापर्यंत पोचणार्या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले.
सहभाग : हेमंत राजोपाध्ये, नर्मदा खरे, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
हृषीकेश गुप्ते हे सध्याचे आघाडीचे भयकथालेखक. खरंतर असं लेबल लावणं त्यांना अन्यायकारकच ठरेल. त्यांच्या गूढकथा, भयकथा, रहस्यकथा... बघता बघता नकळत मानसशास्त्रीय गुंत्यात वा अद्भुताच्या प्रांतात कधी खेचून नेतात कळत नाही. त्यांच्याशी त्यांच्या कथाकादंबर्यांबद्दल आणि त्यांच्या लिहिण्यावाचण्याच्या आवडीनिवडींबद्दल गप्पा. सहभाग : ऋषिकेश गुप्ते, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
चिन्मय दामले यांच्याशी मराठी पाकपुस्तकांबद्दल गप्पा. मराठी पाकपुस्तकांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक इतिहास अतिशय मजेशीर आणि उद्बोधक आहे. त्याबद्दल आणि तिथून आजवर झालेल्या पाकपुस्तकांच्या प्रवासाबद्दल चिन्मय दामले यांच्याशी मारलेल्या गप्पा.
सहभाग : चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
गौरी देशपांडे यांच्या मराठी साहित्यातल्या विशेष श्रेयाविषयी, लोकप्रियतेविषयी, मर्यादांविषयी, तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीविषयी गप्पा.
सहभाग : माया पंडित, जितेंद्र वैद्य, मेघना भुस्कुटे, नंदन होडावडेकर, रंजना निकते.
सत्र पंधरावे : मराठी संगीत नाटकांच्या आर्थिक इतिहासाबद्दल अभ्यास करताना आदूबाळ यांनी अनेक पुस्तकं वाचली. त्या पुस्तकांविषयीच्या या गप्पा.
पपायरस प्रकाशनाचा 'पिवळा पिवळा पाचोळा' हा अनिल साबळे लिखित कथासंग्रह 2021 साली प्रकाशित झाला. त्या कथासंग्रहाची ही ओळख.
पुण्यामुंबईबाहेरच्या लोकांची सांस्कृतिक उपासमार... जुन्यात अडकून पडलेली समीक्षा...
ताजं तरतरीत लिहिणारे नवे लेखक... वितरणव्यवस्थांचं गायब असणं...
मराठी कंटेटची तहान आणि ती भागवण्याची इच्छाच नसलेले लेखक-दिग्दर्शक-निर्माते...
दक्षिण भारतीय चित्रपटांचं ऋण...
समाजमाध्यमांनी आणि मराठी संस्थळांनी लिहिते केलेले लोक...
फेसबुक आणि ब्लॉग्सनी वाहता केलेला लेखक-वाचक संवाद...
एक ना दोन -
#पुस्तकगप्पा 'न- नायक' आणि 'मिडनाईट मॅटिनी'च्या लेखकाशी - अर्थात अमोल उदगीरकर यांच्याशी
मिडनाईट मॅटिनी : देशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
Pustak Gappa : Amol Udgirkar Interview by Meghana Bhuskute #PustakGappa #पुस्तकगप्पा
हरिती प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या भटकभवानी' या ललित-वैचारिक लेखसंग्रहाच्या लेखिका समीना दलवाई यांची मुलाखत.
पुस्तकगप्पा: सत्र बारावे
सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, प्राची देशपांडे, शिल्पा पाठक, नंदन होडावडेकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र अकरावे : सुशील शुक्ल यांच्याशी गप्पा 'इकतारा' प्रकाशनाबद्दल
सहभाग : सुशील शुक्ल, सई केसकर, ऋषिकेश दाभोळकर, मेघना भुस्कुटे, ऋजुला कुलकर्णी, आरोही देशपांडे, विक्रमादित्य रानडे, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र दहावे : इतिहास आणि फिक्शन : प्राची देशपांडेंसह
सहभाग : प्राची देशपांडे, नंदा खरे, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र नववे: किरण गुरव यांच्याशी गप्पा
सहभाग : किरण गुरव, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र आठवे : विश्वामित्र सिंड्रोम : गप्पा पंकज भोसले यांच्याशी
सहभाग : पंकज भोसले, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र सातवे : नंदा खरे यांच्याशी गप्पा : 'कहाणी मानवप्राण्याची' आणि इतर नॉन-फिक्शन
सहभाग : नंदा खरे, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, (किरण लिमये) उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान : https://www.facebook.com/PustakGappa संपर्क : marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र सहावे : मेघना पेठे यांच्या साहित्याविषयी...
सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, शिल्पा पाठक, असिता आजगांवकर, सरिता सोमाणी, किरण लिमये, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
पुस्तकगप्पा : सत्र पाचवे: एम अॅंड द बिग हूम : कादंबरी आणि भाषांतर
प्रमुख वक्ते : जेरी पिंटो, शांता गोखले । सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर, (किरण लिमये) उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com/2021/09/blog-post_7.html फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com