
हृषीकेश गुप्ते हे सध्याचे आघाडीचे भयकथालेखक. खरंतर असं लेबल लावणं त्यांना अन्यायकारकच ठरेल. त्यांच्या गूढकथा, भयकथा, रहस्यकथा... बघता बघता नकळत मानसशास्त्रीय गुंत्यात वा अद्भुताच्या प्रांतात कधी खेचून नेतात कळत नाही. त्यांच्याशी त्यांच्या कथाकादंबर्यांबद्दल आणि त्यांच्या लिहिण्यावाचण्याच्या आवडीनिवडींबद्दल गप्पा. सहभाग : ऋषिकेश गुप्ते, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.