
लॉकडाऊनच्या आधी हसतखेळत शाळेत जाणारी मुले हे नेहमी दृष्टीस पडणारे चित्र होते. पण आता मात्र कोरोनानंतरच्या काळात हीच मुले रस्त्यांवरून गायब होऊन घरात लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅबपुढे बसलेली आपण पाहतो. हे चित्र आपण सोशल मीडिया, बातम्यांद्वारे पाहिलेलेच आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांसाठीही ही व्यवस्था नवीन आहे. गेल्या काही काळापासूनच शिक्षणाला तंत्रज्ञानाची, समजमध्यामांची जोड द्यायची सुरुवात झाली होती. पण याची खरंच गरज आहे का? किती दिवस हे चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटायजेशन व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे.