
माणसाला कुठल्या न कुठल्या गोष्टीची सतत चिंता वाटत राहते. त्याच्या पाठी सतत कुठली न कुठली भीती असते. चिंता, भीती यांचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळं जर आपण चिंता मुळात का वाटते हेच समजून घेतलं तर! सिग्मंड फ्रॉइड यांचं याबाबतचं विश्लेषण काय आहे, हे सांगत आहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके.