Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
News
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts125/v4/97/0b/e9/970be9ff-0681-4531-cb86-fc55367bfbb4/mza_7940892564526246372.jpg/600x600bb.jpg
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
Mandar Kulkarni
16 episodes
6 days ago
नाटकवाला प्रस्तुत अनेकविध नाट्यकृती.
Show more...
Performing Arts
Arts
RSS
All content for Natakwala | Marathi Kavita | Stories | Information | is the property of Mandar Kulkarni and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
नाटकवाला प्रस्तुत अनेकविध नाट्यकृती.
Show more...
Performing Arts
Arts
Episodes (16/16)
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
भूतानुभव
गोष्ट 1
Show more...
2 years ago
11 minutes

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - फांद्यांमधूनी चंद्र - बा. भ. बोरकर

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती
कविता - फांद्यांमधूनी चंद्र
कवि - बा. भ. बोरकर
अभिवाचक - मंदार कुलकर्णी

Show more...
4 years ago
1 minute 42 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - अहि-नकुल - कुसुमाग्रज


मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती

कविता - अहि-नकुल

कवि - कुसुमाग्रज

अभिवाचक - मंदार कुलकर्णी

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

Show more...
4 years ago
4 minutes 20 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - मातीची दर्पोक्ती - कुसुमाग्रज

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती
कविता - मातीची दर्पोक्ती
कवि - कुसुमाग्रज
अभिवाचक - मंदार कुलकर्णी

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती

थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात
वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात
पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
पाहून हासु ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति
त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

Show more...
4 years ago
3 minutes 29 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - वामांगी - अरुण कोल्हटकर

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती - कविता
कविता - वामांगी
कवि - अरुण कोल्हटकर

देवळात गेलो होतो मधे

तिथे विठ्ठल काही दिसेना

रख्माय शेजारी

नुसती वीट

मी म्हणालो असू दे

रख्माय तर रख्माय

कुणाच्या तरी पायावर

डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं

डोकं काढून घेतलं

आपल्यालाच पुढेमागे

लागेल म्हणून

आणि जाता-जाता सहज

रख्मायला म्हणालो

विठू कुठे गेला

दिसत नाही

रख्माय म्हणाली

कुठे गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या

उजव्या अंगाला

मी परत पाहिलं

खात्री करून घ्यायला

आणि म्हणालो,

तिथे कुणीही नाही

म्हणते, नाकासमोर

बघण्यात जन्म गेला

बाजूचं मला जरा

कमीच दिसतं

दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकडं

जरा होत नाही

कधी येतो, कधी जातो

कुठं जातो, काय करतो

मला काही काही

माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून

नेहमी बाजूला असेल विठू

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले

आषाढी-कार्तिकीला

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कसं कुणी

सांगितलं नाही

आज एकदमच मला

भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगाचं

एकटेपण...

Show more...
4 years ago
1 minute 51 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - प्रेम - कुसुमाग्रज
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - प्रेम कवि - कुसुमाग्रज अभिवाचक - मंदार कुलकर्णी पुरे झाले चंद्रसूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदीनाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय? डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
Show more...
4 years ago
2 minutes 24 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - गणपत वाणी - बाळ सीताराम मर्ढेकर

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती
कविता - गणपत वाणी
कवि - बाळ सीताराम मर्ढेकर
अभिवाचक - मंदार कुलकर्णी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवूनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिऱ्हाईकाची कदर राखणे;
जिरे,धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऎशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरुन गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला

Show more...
4 years ago
1 minute 48 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठी कविता - कणा - कुसुमाग्रज

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती
कविता - कणा
कवि - कुसुमाग्रज
अभिवाचक - मंदार कुलकर्णी

'ओळखलत का सर मला'--पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
कळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली—

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले—

कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'-

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला—

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!

Show more...
4 years ago
2 minutes 25 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
हर कोई ऍक्टर नहीं बन सकता - पं. सत्यदेव दुबे

A message for every actor by Pandit Satyadev Dubey
Reciter - Mandar Kulkarni

Show more...
4 years ago
2 minutes 18 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मला आवडलेलं एक वाक्य - राम गणेश गडकरी

Try | understand | Learn & Recite it again n again until you do it in a single breath.

Show more...
4 years ago
47 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मला आवडलेलं एक वाक्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

Try | understand | Learn & Recite it again n again until you do it in a single breath.

Show more...
4 years ago
48 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
Audio Book - अपरिचितांच्या क्रांतीकथा क्र. ३ - हुतात्मा प्रद्योत
संपूर्ण कथासंग्रह ऐकण्यासाठी संपर्क - 9923088335 अपरिचितांच्या क्रांतीकथा  लेखन - गोपाळ गोडसे  दिग्दर्शन - मंदार कुलकर्णी  सहाय्यक दिग्दर्शक - हृषीकेश करदोडे निर्मिती - नाटकवाला  निर्मिती सहाय्य - नेहा स्टुडिओ  ध्वनी संयोजन - दर्शन पोळ  संगीत - अमिता घुगरी  आवाज - देवेंद्र जोशी, मंदार कुलकर्णी, निखिल चिंचकर, हृषीकेश करदोडे, हृषीकेश जोशी, गिरीजा वनारसे, हेमंत, वरद, प्रतिक.  विशेष आभार - सात्यकी सावरकर
Show more...
4 years ago
10 minutes 46 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
Audio book - माणूस आणि नट - चंद्रकांत जोशी on नाना पाटेकर

संपूर्ण संग्रहासाठी संपर्क - 9923088335
नाना पाटेकर परिचय 

संकलन - श्रीकांत गद्रे 

अभिवाचन - मंदार कुलकर्णी 

Show more...
5 years ago
9 minutes 44 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
Audiobook - नान्या 3D - विक्रम गोखले on नाना पाटेकर

संपूर्ण संग्रहासाठी संपर्क - 9923088335

नाना पाटेकर परिचय 

संकलन - श्रीकांत गद्रे 

अभिवाचन - धनंजय म्हसवडे 


Show more...
5 years ago
7 minutes 25 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मी, माझी सासू आणि अंधश्रद्धा

माझी सासरची मंडळी अंधश्रद्धेविषयी काय विचार करतात ?

- मोठ्या गप्पा - Marathi Poadcast

Show more...
5 years ago
28 minutes 32 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
हॉलीवुडला 'Hollywood' हे नाव कसं पडलं ?

हॉलीवुड विषयी संक्षिप्त माहिती. 

Show more...
5 years ago
3 minutes 32 seconds

Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
नाटकवाला प्रस्तुत अनेकविध नाट्यकृती.