
गोंदियासारख्या दुर्गम भागातून आलेली मराठी मुलगी सृष्टी पाटील पर्यावरणशास्त्राचे धडे घेऊन आता थेट अंतराळ जीवसृष्टीवर संशोधन करते आहे. तिचा आजवरचा प्रवास अत्यंत वेगळा आणि प्रेरणादायी आहे. आपली आवड जोपासत, मनातील कुतुहलभाव कायम राखत करिअर कसे घडविता येऊ शकते, याचे दर्शन तिच्या या प्रवासातून घडते. स्टोरीटेल कट्ट्यावर सृष्टीने तिच्या या प्रवासाचीच नव्हे तर एकूणच या क्षेत्राची, त्यातील विविध संधींची केलेली उलगड वेगळी दिशा देऊन जाते. पर्यावरण अभ्यासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊन जाते.