Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
1885 episodes
1 day ago
Send us a text मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले.....
All content for Life of Stories is the property of Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
Send us a text मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले.....
Send us a text मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले.....
Send us a text प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक चांगली व्यक्ती बनवायचे असते, जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस म्हणून घडू शकेल. जर आपण चांगल्या पालकत्वाबद्दल विचार केला, तर यामध्ये मुलाला चांगले संस्कार देणे, त्याच्या पोषणाची काळजी घेणे, मुलाच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण जपानी पालकांकडून काही टिप्स घेऊ शकतो. उत्तम पालक बनणं हे खूप कठीण काम आहे. यात बरेच चढ-उतार येतात. जपानी मुले, कोणत्याही वयाची असो, त्यांच...
Send us a text एकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण ‘आलं सरकारांच्या मना तिथं देवाचंबी चालंना‘ अशातली गत होती. मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील…छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भ...
Send us a text लहानपणी शाळेचा पीळ फार घट्ट असायचा. किंग जॉर्जमध्ये असताना आम्हाला वाटायचं — "आम्ही सॉलिड स्मार्ट आहोत, धीट आहोत." बालमोहनच्यांना आम्ही ‘गणू’, बावळट म्हणायचो. एखाद्याचं अक्षर पाहून मी सांगू शकतो की तो किंग जॉर्जचा की बालमोहनचा! कारण बालमोहनच्यांचं अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे! ते हुशार असायचे, पण आमच्या मते अतिसुसंस्कृत — शिवीला अपशब्द म्हणायचे इतके सौम्य! आणि त्यांचं आमच्याबद्दलचं मत? "अतिशहाणे, हुशार, पण वात्रट!" आणि आजही कुणी विचारलं की — “किंग जॉर्ज की बालमोहन?” त...
Send us a text "काका मला डॉक्टर किंवा संगीतकार व्हायचा नाही. मला अगदी साध्या मुलाप्रमाणे जगायचं स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि हे मी माझ्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितलेय म्हणून तर मला या साध्या बसने प्रवास करता येतो." " तुम्ही माझ्या घरी याल तर तुम्ही पहाल की दोन परदेशी गाड्या ड्रायव्हर सकट सतत दाराशी उभ्या असतात. मी म्हणायचं अवकाश ते मला अकॅडमी पर्यंत सोडतील आणि संध्याकाळी परत घेण्यासाठी तिथेच थांबून देखील राहतील." वाटलं, संचित आणि त्याचे आई-बाबा खऱ्या अर्थाने एकम...
Send us a text "महागाई वाढली आहे हे तर नक्की. परंतु पैशाला किंमत उरली नाही असं जे आपण सहज म्हणून जातो ते खरं आहे का?" "माझ्या आयुष्यात एक प्रसंग काही वर्षांपूर्वी घडला आणि एक दोन आठवड्यातला. पण दोन्ही लक्षात राहिले. कारण पैशाला किंमत आहे हे पटवून देणारा एक, आणि दुसरा पैशापेक्षा माणुसकी किंवा सहृदयतायांचं दर्शन घडवणारा!
Send us a text लोनपोगारनं सकाळीच आपल्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला, “बाळा, ह्या शंभर मेंढ्या घेऊन शहरात जा, पण हे लक्षात ठेव — ना त्यांना मारायचं, ना विकायचं! आणि तरीही शंभर पोती जव घेऊनच परत यायचं. तो शहरात एका रस्त्याच्या कडेला पाणावलेल्या डोळ्यांनी बसला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी आली, म्हणाली — “काय झालं रे? एवढं चिंतातुर का?” त्याची हकीकत ऐकल्यावर ती हसली आणि म्हणाली — “अरे एवढंच? मेंढ्यांची लोकर काढून विक आणि त्या पैशात शंभर पोती जव घेऊन घरी जा!”.&...
Send us a text गर्दीत वाट काढत एस टी च्या आत घुसणार तोच मला बघून कंडक्टर एकदम ओरडला. " ओ, या बाईला आधी चढू द्या. ते दिवसा या बाईन् दिलेला शाप लागला मला.दोन दिवस जेवनाचे वांदे झालेले." मी उभी थरारले.मी दिलेला शाप ? नाही रे बाबा , माझ्यासारखी सामान्य लेकुरवाळी गृहिणी कसला शाप देणार ? गाडीत चढल्यावर आतून जाणवलं की हा शाप बाईने कुठे दिला होता ? हा तळतळाट 'आईचा' होता. कोणीही आतून अगदी आतून...आत्म्यातून दुखावलं गेलं तर उमटणा-या तळतळाटाची आग भाजून काढतेच काढते. तळतळाट घेऊच नये कोणाचा !
Send us a text एक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्य गेले. डॉक्टरांच्या टीमने आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला . ऑपरेशन साठी फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे त्या कॉलमच्या पुढे त्यांनी E.D. अस लिहलं. आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ...."ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील!"........
Send us a text “काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”* “ होय आहे !." “कधी घेतलात?”* “झाली की १५-२० वर्षे.” “व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”* “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !” “आता कुठे असतो.”* “माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.” “मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”* “अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.”
Send us a text त्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती.. "पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच? 'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून.. त्यातील काही लोक बोलू लागलं.. 'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘ 'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘ त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आम...
Send us a text डेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल’ आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल’ या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!’’ पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन’. तिथपासून आजपर्यंत डोपामाईन, ग्लुटामिक ॲसिड, सिरोटोनीन अशी १००-१२५ जीवर...
Send us a text लाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl’ (झॉकलेटल) म्हणजे ‘कडू पाणी’! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवी...
Send us a text दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला. सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता. तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले. मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे सुरु झाले, "ए चोरा! काय करतोस रे?".......
Send us a text खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का लाजायचे ? अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खाताना सुद्धा..." आसपासचे लोक काय म्हणतील ?" यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.....
Send us a text परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य ...
Send us a text गोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला targeted drug delivery म्...
Send us a text जाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात’, असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.
Send us a text मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले.....