
मित्रांनो, ५ वर्षांपूर्वी आम्ही क्रिककथा सुरु केलं तेव्हा देखील पैसे कमवावे हा हेतू नक्की नव्हता. आम्हाला आमच्या आवडत्या खेळासाठी काहीतरी करायचं होतं आणि आज क्रिककथाच्या माध्यमातून आम्ही काही करू शकलो याचा आनंद आहे. लवकरच क्रिककथाचा ५ वा अंक बाजारात येईल
Hey Cricket lovers, IT'S TIME ! Crickatha 2025 – the only Diwali special issue dedicated entirely to cricket – is now open for bookings! Secure your copy today by filling this quick form. Book your copy today
https://forms.gle/PJcu762QUZ8rVuAh7 याचा नक्कीच आनंद आहे. पण यावर्षी पावसाने महाराष्ट्रात, खास करून मराठवाड्यात जे थैमान घातले आहे ते बघून खूप त्रास होतोय. आपल्या त्या मित्रांसाठी काही करण्याची मनापासून इच्छा आहे. आपले अनेक मित्र वेगवेगळ्या पद्धतीने या भागातील लोकांसाठी काही ना काही करत आहेत, त्यामध्ये आम्ही पण आमचा एक खारीचा वाटा उचलू इच्छितो. क्रिककथा २०२५ च्या विक्रीतून आलेल्या पैशांचा वापर आम्ही या पूरग्रस्तांसाठी देऊ इच्छितो. या अंकाच्या विक्रीतून आलेला मोठा भाग आम्ही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहोत. ही रक्कम किती असेल, कधी आम्हाला ती देता येईल याबद्दल मी आत्ता तरी काही सांगू शकणार नाही, पण लवकरात लवकर ती एखाद्या चांगल्या संस्थेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्या या प्रयत्नांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायला आवडणार असेल तर जरूर या. आपण सगळेच आपल्या या बांधवांसाठी एकत्र येऊया. क्रिककथाचे अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी आम्हाला मदत करा. आपली एक छोटी मदत देखील आपल्या पूरग्रस्त मित्रांसाठी महत्वाची ठरू शकते.
चला पटकन हा फॉर्म भरा, म्हणजे क्रिककथा दिवाळी अंक तुम्हाला घरपोच मिळेल.
https://docs.google.com/forms/d/1vJk4sHXGG1BzObarkYHKgRormdhGLgv3zGNTgwed0lU/edit