
काही वर्षांपूर्वी ग्रंथालीच्या ‘शब्दरुची’ या अंकात ‘संगीतक्षेत्रातील मराठी’ हा लेख मी लिहिला होता. आजच्या कौशलकट्ट्यावर मी या लेखाचं अभिवाचन करणार आहे. लेख ५-६ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यामुळे काही त्यावेळचे संदर्भ जरी लेखात असले तरी भावसंगीत आणि मराठी भाषेचे संबंध कसे बदलत चालले आहेत हा विषय आजच्या काळालाही लागू आहे.
‘संगीताला भाषा नसते’ असं म्हणतात ती खरोखर नसते का? प्रेमगीतांची मिश्र भाषा मराठीत का ऐकू येऊ लागली? एका भाषेत संगीत करणारा संगीतकार जेव्हा दुसऱ्या भाषेत संगीत करतो तेव्हा तो पहिल्या भाषेच्या कुठल्या गोष्टी दुसऱ्या भाषेच्या गाण्यात आणतो? अशा वेगवेगळ्या विषयांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत.
Watch the episode on YouTube
https://youtu.be/J1CxD3FyHDQ