
आयुष्यात कठीण प्रसंगी निर्णय घेणं फार अवघड काम आहे. आपला निर्णय चुकला तर काय होईल ह्या भीतीने आपण बरेचदा निर्णयच घेत नाही. पण निर्णय न घेण्याने आपण बरेचदा आलेली संधीला मुकतो.
डॉ शारदा बापट ह्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमध्ये बरंच काही शिकलो, पण प्रामुख्याने एक फॉर्मुला शिकलो, ज्याचा उपयोग निर्णय घेण्यात नक्कीच होतो आहे.