
पर्व २ भाग २: पाहुण्या - नीना जठार गेल्या महिन्याभरात बरेच महत्वाचे दिवस होऊन गेले. त्यातले ह्या उपक्रमासाठी उपयुक्त म्हणजे मराठी राजभाषा दिवस, कवी वि.वा.शिरवाडकर ह्यांचा जन्मदिन, पुण्यतिथी आणि तशीच कवी सुरेश भट ह्यांची पुण्यतिथी आणि राट्रीय महिला दिवस. त्यात आणि कवी कृ.ब.निकुंब ह्यांचे जन्मशताब्दी वर्षीही साजरे होत आहे. ह्याच दिवसांचा आशय घेऊन, आजचा हा भाग गप्पा आणि कवितांमध्ये रंगला. ह्या भागात सौ. नीना जठार कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून लाभल्या. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे:
'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.