
पर्व २ भाग ४
आज जगभरात भारतीयांनी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशाच्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण दररोज घेतोच. तरीही आता वेळ आहे एका वेगळ्या पातळीवरच्या स्वातंत्र्याची. त्यावर काही सादर केलं आहे. त्यासोबत प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांना त्यांच्या जन्मतिथी निमित्त स्मरून त्यावर काही गप्पा झाल्या आहेत. आणि ऑगस्ट मध्ये आषाढ श्रावणावर नाही बोलून कसं चालणार? अशा काही विषयांवर दिलखुलास गप्पा आणि कवितेची मैफिल रंगली. या भागातील कविता खालील प्रमाणे:
सर्व पूर्व भाग सोईस्कर युट्युब वर बघू शकता https://www.youtube.com/channel/UCR2sTx876mKXOknsw4UGrtg
--- 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.