दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे. मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी