
SHOW LESS1918 ते 1921 अशी तीन वर्षे भारतात व जगभरात 'स्पॅनिश फ्लू'ची साथ आली होती. त्या साथीत सर्वाधिक जीवितहानी भारताची झाली होती. किती लोक मृत्युमुखी पडले याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात. पण ते आकडे सव्वा कोटी ते दोन कोटी या दरम्यान असतात. त्यावेळी भारताची लोकसंख्या 25 कोटी होती. म्हणजे त्या साथीत किमान पाच टक्के माणसे मृत्युमुखी पडली. परिणामी 1921च्या जणगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या होती, ती 1911 पेक्षा काही लाखांनी कमी भरली. असा प्रकार गेल्या शतकात एकदाच झाला आहे. तर त्या साथीचे वर्णन साने गुरुजींनी त्यांच्या 'श्यामचा जीवनविकास' या 1938 मध्ये लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील एका प्रकरणात केले आहे. सुहास पाटील यांनी या प्रकरणाचे केलेले अभिवाचन ऑडिओ स्वरुपात इथे प्रसिद्ध करत आहोत. शंभर वर्षांत काय बदलले व काय नाही याचा विचार वाचकांना करता यावा यासाठी...