
'स्वतःच्या देशाच्या नागरिकांविरुद्ध शासनपुरस्कृत असहिष्णुतेमुळे संपूर्ण राष्ट्र लयाला जाते; असा मोठा आणि स्पष्ट इतिहास आहे. उलटपक्षी, सहिष्णू शासनामुळे राष्ट्र भक्कम बनते असाही इतिहास आहे. या इतिहासाचे आकलन करून स्मरण करणे, त्यापासून धडा शिकणे राष्ट्ररक्षणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी काळानुसार क्रमवारी लावलेली ही सात महत्त्वाची उदाहरणे थोडक्यात समजून घेऊ.'
आनंद करंदीकर यांनी विविध नियतकालिकांत लिहिलेल्या व काही अप्रसिद्ध अशा एकूण 30 लेखांचा संग्रह 'वैचारिक घुसळण' या नावाने पुढील महिन्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे. राजकीय, शिक्षण व रोजगार, स्त्री-पुरुष समानता, धर्मचिकित्सा, चळवळी, विंदा करंदीकर आणि परिशिष्ट अशा सहा विभागात मिळून 30 लेख आहेत. या सर्व लेखांचे स्वरूप ललित-वैचारिक आहे. यातील 'असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे' या लेखाचे वाचन केले आहे समीर शेख यांनी.