
उणेपुरे 44 वर्षांचे आयुष्य लाभलेले कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांनी 22 मार्च 1970 रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. मुस्लीम समाजसुधारणांसाठी संघर्ष व प्रबोधन करणाऱ्या मंडळाने गेल्यावर्षी म्हणजे 22 मार्च 2020 रोजी 50 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी विनोद शिरसाठ यांनी संवाद साधला होता. मात्र ही मुलाखत झाल्यानंतर दोनच दिवसांनी लॉकडाऊन कालखंड सुरु झाला. त्यामुळे मंडळाचा सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. परिणामी मुलाखतीचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला नव्हता. काल, म्हणजे 22 मार्च 2021 मंडळाने 51 वर्षे पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर हा दीर्घ संवाद प्रसिद्ध करत आहोत. या संवादातून मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वाटचालीचा मागोवा, वर्तमानाचा आढावा आणि भविष्याचा वेध घेण्यात आला आहे. व्हिडिओ एडिटिंग सुहास पाटील यांनी केले आहे.