
67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 'खिसा' या लघुपटाने नॉन फिचर फिल्म या विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार पटकावला. खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर हा लघुपट भाष्य करतो. एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी कथा त्यात तरलपणे मांडण्यात आली आहे. यानिमित्ताने या लघुपटाचे लेखक आणि कलाकार कैलास वाघमारे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माधवी वागेश्वरी यांनी...