
राज्य सरकारचे 2019 साठीचे वाङ्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात ललित गद्य विभागात प्रथम प्रकाशन असलेल्या सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार साधना प्रकाशनाच्या 'बिजापूर डायरी' या पुस्तकाला मिळाला आहे. डॉ. ऐश्वर्या रेवडकर लिखित या पुस्तकात छत्तीसगडमधील बिजापूर या जिल्ह्याचे सकारात्मक डॉक्युमेंटेशन आहे. सजग, संवेदनशील असणाऱ्या ऐश्वर्या यांनी पुस्तकात डॉक्टरी करीत असताना अनुभवलेले आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदल आणि सर्जनशील प्रयोग मांडले आहेत. 'बिजापूर डायरी'ला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्याशी हिनाकौसर खान यांनी साधलेला हा संवाद.