
राज्य सरकारचे 2019 साठीचे वाङ्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात कृषी व पूरक व्यवसाय या विषयावरील सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाचा पुरस्कार मिळाला साधना प्रकाशनाच्या रमेश जाधव लिखित 'पोशिंद्याचे आख्यान' या पुस्तकाला. शेती प्रश्नावर व्यापक आणि विवेकी दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक आहे. 'पोशिंद्याचे आख्यान'ला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी तसेच शेती प्रश्न आणि सध्या चर्चेत असलेल्या कृषी कायदे यांच्याविषयी रमेश जाधव यांच्याशी सुहास पाटील यांनी साधलेला हा संवाद.