
कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल?
आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. या दुसऱ्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे?
- - - - - - - - -
Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/
www.youtube.com/channel/UCNpOkmTIb_di1r38ASE4Kpg
Join our telegram channel: https://t.me/kartavyasadhana