
आज 20 मार्च, जागतिक कथाकथन दिवस. या निमित्ताने हमीद दलवाई यांची ‘ब्राह्मणांचा देव’ ही कथा ऑडिओ स्वरुपात प्रसिद्ध करत आहोत. दलवाई यांनी 1966 मध्ये लिहिलेली ही कथा साधना प्रकाशनाच्या 'जमीला जावद' पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. मुलं मोठी होत असताना असा एक क्षण येतो की, धर्मभेदाची जाणीव त्यांच्या मनात प्रवेश करते आणि तेव्हा ती आतून हलून जातात, त्याकडे ही कथा अंगुलीनिर्देश करते. या कथेचं वाचन केलं आहे मृद्गंधा दीक्षित यांनी.