
श्री ज्ञानेश्वरी वाचन
अध्याय : १ ओवी : ३१ - ३५
ना तरी सकळ धर्मांचें माहेर | सज्जनांचें जिव्हार | लावण्यरत्नभांडार | शारदेंचें ||३१||
नाना कथारूपें भारती | प्रकटली असे त्रिजगतीं | आविष्करोनि महामती | व्यासाचिये ||३२||
म्हणोनि हा काव्यां रावो | ग्रंथ गुरुवतीचा ठावो | एथूनी रसां झाला आवो | रसाळ - पणाचा ||३३||
तेवींचि आइका आणीक एक | एथूनी शब्धश्री सच्छास्त्रिक | आणि महाबोधीं कोंवळीक | दुणावली ||३४|
एथ चातुर्य शाहणें झालें | प्रमेय रुचीस आलें | आणि सौभाग्य पोखलें | सुखाचें एथ ||३५||